सांस्कृतिक नाट्यगृहाकरीता नगर पालिका क्षेत्रातील जागा आ.राजेन्द्र पाटणी यांनी नगर पालिकेमार्फत उपलब्ध करून सभागृहाला मंजूरी द्यावी.
- कारंजातील कलाकारांच्या सर्वच संस्थाची एकत्र येऊन मागणी.
कारंजा (लाड) : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) ही ऐतिहासिक,धार्मिक व आध्यात्मिक तिर्थक्षेत्राची, आशिया खंडातील पहिली सुपर बाजारपेठ असलेली नगरी कलाकारांची खाण म्हणूनही सुप्रसिद्ध आहे. येथील श्री गुरुमंदिर संस्थान व जैन धर्मियाच्या तिर्थक्षेत्रामुळे बाराही महिने येथे मोठमोठे जागतिक पातळीवरील विद्वान, जगद्गुरू शंकराचार्य, राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक,व्याख्याते येथे येत असतात.शिवाय कारंजा नगरी ही आदर्श शैक्षणिक नगरी, सांस्कृतिक नगरी,कला व चित्रपट नगरी म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे येथे नेहमीच केन्द्रिय मंत्री, मुख्यमंत्री, महामहिम राज्यपाल येथे येत असतात.

परंतु स्वातंत्र्य काळापासूनच येथील जनतेला स्थानिक कारंजा जन्मभूमिचा एकही आमदार मिळालेला नाही. व त्यामुळे हे शहर विकासा पासून सदोदीत उपेक्षित राहीले आहे व उपेक्षितच राहणार आहे. येथे स्थानिक कलावंताना, लाख दोन लाख रसिक प्रेक्षकांच्या बैठकी इतपत, स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक सभागृह किंवा नाट्यसभागृहच नाही. शिवाय मोठ्या नेत्यांच्या सभेकरीता स्वतंत्र व्यासपिठ आणि गॅलंरीयुक्त खुले नाट्य सभागृह सुद्धा नाही. त्यामुळे कारंजा क्षेत्रातील नाट्यकलावंत आणि चित्रपट कलावंत शासनानेच उपेक्षित ठेवला आहे. सांस्कृतिक नाट्यगृहाची गरज ओळखून येथील कलावंतानी वेळोवेळी सभागृहाची मागणी लावून धरली मात्र कारंजेकर कलावंताची येथील राजकिय नेत्यांनी वेळोवेळी उपेक्षाच केली हे कटूसत्य आहे. नुकतेच कारंजा नगरीतील अखिल भारतिय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ मुंबईचे लोकनियुक्त सदस्य नंदकिशोर कव्हळकर यांच्या पुढाकाराने कारंजा नगरीतील कलाक्षेत्रातील अग्रगण्य संस्था विदर्भ लोककलावंत संघटना, अविष्कार बहुउद्देशिय संस्था, अष्टविनायक कल्चरल ग्रुप, ईरो फिल्मस् एन्टरटेन्टमेन्ट,आदर्श जय भारत सेवाभावी संस्था, जिव्हाळा परिवार,अ. भा. मराठी नाट्य परिषद इत्यादीच्या पदाधिकारी कलावंत मंडळीनी, नंदकिशोर कव्हळकर,रविन्द्र नंदाने,संजय कडोळे,गिरीष जिचकार,डाँ.ज्ञानेश्वर गरड, अतुल धाकतोड,डॉ.इम्तियाज लुलानिया,रोमिल लाठीया,अश्विन जगताप,विजय खंडार,रामबकस डेंडूळे,उमेश अनासाने, गोपिनाथ डेंडूळे इत्यादी मंडळींनी,कारंजा नगरीचे आमदार राजेंद्र पाटणी यांची भेट घेऊन त्यांना सांस्कृतिक नाट्यगृहाची मागणी केली आहे. आपल्या मागणीमध्ये त्यांनी कारंजा नगर पालिकेची सध्या धूळ खात पडलेल्या जुन्या नगर पालीका मानवी दवाखान्याची जागा मागीतली. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी सांगीतले की, नाट्यगृहा करीता माझेकडे पुष्कळ निधी उपलब्ध असून तुम्ही जागा दाखवा. व निधी पुरवीतो. या संदर्भात सांगायचे महत्वाचे म्हणजे आमदार राजेंद्र पाटणी हे गेल्या पंचवीस वर्षापासून कारंजा नगरीच्या संपर्कात असून, चौथ्या वेळी ते विधानसभेत ह्या मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे त्यांना मतदार संघाचा परिपूर्ण अभ्यास आहे.कोणताही आमदार म्हटले म्हणजे तो त्या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी असतो. अडाणी भाषेत सांगायचे तर आमदार म्हणजे मतदार संघातील नागरिकांचा राजा असतो.व या लोकप्रतिनिधीने किंवा मतदार संघाच्या राजाने म्हणजेच आमदार राजेंद्र पाटणी यांनी स्वतः कलाकाराच्या मागणीकडे लक्ष्य वेधून,कारंजा नगर पालिकेच्या मालकीची किंवा कारंजा पंचक्रोशितील कोणतीही शासकिय मालकीची जागा उपलब्ध करून देऊन नाट्यगृहाची मागणी पूर्ण करून कलाकारांना व्यासपिठ उपलब्ध करून देण्याची कृपा करावी अशी विनंती कारंजा येथील कलावंताच्या सर्वपक्षिय विविध संस्थानी केली आहे. तरी सुद्धा आगामी विधानसभा निवडणूकांपूर्वी आमदार राजेंद्र पाटणी यांचेकडून नाट्यगृहाची मागणी पूर्ण होणार काय ? हे पहावे लागणार आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....