कारंजा : आठवडाभरापासून सध्या महाराष्ट्रात दररोज सर्वत्र सोसाट्याचा वारा, कमी अधिक प्रमाणात पाऊस आणि गारपिट होत असल्याने यंदा प्रथमच चक्क उन्हाळ्यात, पाऊस सुरु असून शनिवारी झालेल्या पावसामुळे कारंजा-पिंजर-अकोला मार्गावर आसरा मातेच्या,डोणद गावाजवळून वाहणाऱ्या, काटेपूर्णा नदीला पूर गेल्यामुळे पूराचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने सायंकाळी पाचचे सुमाराला काही तासांपर्यत, रस्त्यावरील वाहतूक खोळंबल्याचे दिसून आल्याचे वृत्त मिळाल्याचे संजय कडोळे यांनी कळविले आहे.