कारंजा (लाड) : आई मंगला इंगोले हिच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी,दिव्यांगत्वावर मात करून स्वतःच्या कतृत्वाने यशस्वी ठसा उमटविणारी यशस्वी तरुणी कु. ज्योती रमेश इंगोले पोलीओ सारख्या गंभीर आजारामुळे १०० % दिव्यांग असतांनाही शिवणकामाचा व्यवसाय करून स्वबळावर उभी राहू पहात आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठामधून तीने आपले शिक्षण पूर्ण केले असून, दिव्यंगत्वाची तमा न बाळगता नेहमी चेहर्यावर स्मितहास्य घेऊन ती इतरांशी संवाद साधत असते.तीला सामाजिक धार्मिक आध्यात्मिक कार्याची आवड असून,श्रीक्षेत्र शेगावीच्या राणा संत गजानन महाराजांची आणि संत नामदेव महाराजांची ती परमभक्त असून तीने संत गजानन महाराज मंदिरात एकविस अध्यायी पारायण पूर्ण केले शिवाय दि.09 फेब्रुवारी च्या दिव्यांगाच्या वारी दिंडीमध्ये कारंजा ते शेगाव येथील वारी पूर्ण केली त्याबद्दल संत गजानन महाराज मंदिर सेवाधारी मंडळाच्या वतीने विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी भगवे वस्त्र देऊन मंदिरामध्ये तीचा गुणगौरव केला आहे.संत गजानन कृपेने तीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हीच मंगल कामना . . !