अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या माध्यमाने प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग बांधवांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम संपूर्ण भारतभर निरंतर राबवले जात आहेत . दिव्यांग बांधवांसाठी दि.१६ ते २४ ऑगस्ट २०२३ दरम्यान संस्थेच्या कार्यालयात सुगंधी फुलवाती निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली. श्रावण मासापासून येणाऱ्या विविध समारंभासाठी व धार्मिक उत्सवासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे नवीन उत्पादन दिव्यांग ज्योती दिव्यांग बांधवांनी तयार केले आहे.
सुगंधी फुलवाती निर्मितीतून दिव्यांग बांधवांना रोजगार प्राप्त होणार असून हे उत्पादन भारता सोबतच भारताबाहेरही संस्थेतर्फे उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे यांनी दिली आहे . सदर सुगंधी फुलवाती शुद्ध कापूस व तुपापासून तयार केल्या असून त्या बराच वेळ प्रज्वलित राहतात अशी माहिती प्रशिक्षक अनामिका देशपांडे यांनी दिली आहे . प्रत्येक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात ह्या सुगंधी फुलवाती उपयोगात आणाव्यात ज्याद्वारा दिव्यांग बांधवांना रोजगार प्राप्त होईल याच रोजगार निर्मितीच्या उपक्रमात दिव्यांग व्यक्तीबरोबरच गरजू व निराधार महिलांना सहभागी करून घेतले जाणार आहे.अधिक माहिती करिता ९४२३६५००९० या संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य
रोहित सुर्यवंशी, सचिन शिरसाट, नेहा पलन, अस्मिता मिश्रा,लिना बोळे, पूजा गुंटीवार, अंकुश काळमेघ व संजय तिडके यांनी केले आहे.