वरोरा:-
तालुक्यातील आमडी येथील सेवा सहकारी संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 13 पैकी 9 जागा जिंकत सत्तेचा झेंडा रोवला.
आमडी सेवा सहकारी संस्थेवर विरोधी पक्षांनी जवळपास 20 वर्ष सत्ता उपभोगली .या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ऍड.मोरेश्वरराव टेमुर्डे यांचे नेतृत्वात 13 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले.
13 पैकी 9 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आणण्यास यशस्वी ठरले.विरोधकांची 20 वर्षाची असलेली सत्ता खेचून आणली.
या निवडणुकीत भास्कर तुरारे, गणेश जवादे,गोपाल ढवस, बेबी शास्त्रकार,बाबा पाल,शंकर पाल,मारोती मडावी, अनिल ढवस,मंदा ढवस हे विजयी ठरले.या निवडणुकीत जयंत टेमुर्डे,चुडामन बलकी, महादेव पेंदोर,जगन ढवस,चंद्रकांत नागरकर, मनोहर येडे,राजू येडे,महादेव पेंदोर,राजू गानफाडे,अजय पाल,राजू गेडाम यांनी अथक प्रयत्न केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....