वाशिम : परमहंस संत श्री परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथाचा सामुदायिक पारायण सोहळा शनिवार, 01 जून 2024 रोजी,विदर्भ कुलस्वामिनी श्री अंबादेवी संस्थानच्या परिसरातील अंबागेट जवळ किर्तन सभागृहात आयोजित सकाळी 8 :00 वाजता सामूहिक पारायण सोहळा होणार आहे. तरी वाशीम जिल्ह्यातील वाशिम,कारंजा, मानोरा,मंगरूळपिर,रिसोड, मालेगाव येथील परमहंस श्री परशराम महाराज भक्तपरिवाराच्या सर्व सेवाधारी व भक्तगण तसेच गुरव समाज बंधु भगिनींनी सकाळी 8:00 वाजता वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले असून ह्या भव्य दिव्य विराट ऐतिहासिक सुवर्ण संधीचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे.
परमहंस श्री परशराम महाराज सेवाधारी परिवार तर्फे भव्य दिव्य "न भूतो न भविष्यति"सदर पारायण सोहळा आयोजन केले जात आहे. नियोजनानुसार सकाळी 8:00 ते 8.30 वाजताच्या दरम्यान महाराजांच्या ग्रंथाची दिंडी काढण्यात येईल.
पारायण सोहळा ठीक 8.30 वाजता सुरू होईल. दुपारी 12.00 वाजता विराम घेण्यात येईल. पारायण विरामा नंतर पूर्ववत पारायण सुरू करण्यात येणार आहे. पारायण पूर्ण होताच आरती झाल्याबरोबर सर्व पारायणकर्ता व सेवाधारी यांच्याकरिता महाप्रसादाचे देखील आयोजन केले आहे. बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तांकरिता अगोदरच्या दिवशी शुक्रवार 31 मे 2024 रोजी रात्री
मुक्काम व भोजनाची सर्वोतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे.
परमहंस श्री परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचे पारायण सोहळ्यामध्ये खालील वस्तू सोबत आणणे आवश्यक आहे.
1) महिमा ग्रंथ
2) दोन आसन
3) पारायणाला येणाऱ्या पुरुषांनी पांढरा शर्ट,पांढरी धोती किंवा पैजामा व महिलांनी पिवळी साडी किंवा लाल साडी किंवा नऊवार पातळ परिधान करावी.
4) ज्यांना नित्य क्रमाने औषध घ्यायचे असतात.त्या औषधी सोबत आणाव्या.ज्या पारायणकर्त्याकडे श्री परमहंस परशराम महाराजांचा महिमा ग्रंथ उपलब्ध नसेल त्यांना अंबादेवी संस्थान मधील कीर्तन हॉल येथे तो खरेदी करता येईल व त्याचे स्वागत शुल्क 150/- रुपये असेल.
सदर कार्यक्रमाकरिता सर्वांनी योग्य वेळेवर उपस्थिती दर्शवावी. ही विनंती देखील आयोजकांनी केली आहे. अधिक माहिती साठी मुख्य सेवाधारी व सेवाधारी परिवाराचे
जयंत सुरेशराव वानखडे मोबा. नं.
9763729131 यांना संपर्क करण्याचे आवाहन सेवाधारी परिवार जलकुंड पिंपळोद यांनी केले असल्याचे परमहंस श्री परशराम महाराज भक्त परिवाराचे विजय पाटील खंडार तथा संजय कडोळे यांनी कळविले.
*परमहंस श्री परशराम महाराजांबद्दल संक्षिप्त माहिती.*
सुमारे 124 वर्षापुर्वी 14 मे 1900 रोजी जैतापुर ता. भातकुली जि.अमरावती या खेडेगावात शिवशंकर परमात्म्याने परशराम नावाने नररूपात भीमाबाई बळीरामपंत (गुरव) वडनेरकर वडिलांचे नाव श्री बळीरामपंत (गुरव) वडनेरकर जळतापुर जिल्हा अमरावती येथे जन्म घेतला. त्यांनी सुमारे 51 वर्षे कित्येक लिला/साक्षात्कार/महिमा करून भक्तांचे कल्याण केले. परशराम महिमा ग्रंथात याचे विस्तृत वर्णन आले आहे. असे वृत्त परमहंस श्री परशराम महाराज भक्त परिवाराचे विजय पाटील खंडार तथा संजय कडोळे यांनी दिले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....