सोलापूर - नुकतेच रविवार दिनांक ५ में रोजी श्री भगवंत संगीत महोत्सव बार्शी येथील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सूर सरगम या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर , पार्श्वगायिका सपना अवस्थी , पार्श्व गायिका बेला सुलाखे , महागायक विजेते मोहम्मद अयाज यांनी आपली कला सादर केली या वेळी दरशन देरे देरे भगवंता , मोरया मोरया मोरया , देवा तुझ्या दारी आलो , कर चले हम फिदा , चल छैया छैया, परदेशी परदेशी जाना नहीं , परबत के उस पार , मी आले मी निघाले , अश्वीनी ये ना , चोरीचा मामला , कभी बंधन जुडा लीया सारख्या अनेक गाणी सादर करण्यात आली , या वेळी बार्शी येथील निरनिराळ्या क्षेत्रांतील मान्यवर सह हजारो रसिक श्रोते उपस्थित होते. देश भक्ती गीते, भक्ती गीते , फिल्मी गीते गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.