कारंजा : अकोला येथील शिवपुराण कथा सप्ताहानिमित्त, पंडित प्रदिप शर्मा यांना "याची देही याची डोळा"पहाण्या करीता आणि त्यांचे आशिर्वाद घेऊन तणावमुक्त होण्याकरीता,केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील भाविकांचा लोंढा अकोला येथील म्हैसपूर शिवारात जमल्यामुळे पाच लाख भाविकांपेक्षा जास्त गर्दी उसळल्यामुळे साहजीकच पोलीस यंत्रणेवरील जबाबदारी व ताणही वाढल्याचे दिसून येत आहे. गर्दीमध्ये हौसे-गवसे-नवसे यांच्या सोबतच पाकीटमार,चेनसाखळी, मोबाईल चोरटे यांची सुद्धा गर्दी झाल्याचे ऐकण्यात येत आहे. यासंदर्भात भाविकाच्या दागीने चोरीच्या रितसर तक्रारीवरून, पोलिस अधिक्षक संदिप घुगे, अप्पर पोलिस अधिक्षीका श्रीमती मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष राऊत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक संतोष महल्ले व पोलीस वृंदाना, सदरहु दागीने चोरी प्रकरणाचा छडा त्वरीत लावण्याचे निर्देश दिले .
त्यानुसार गुन्हे शाखेने, दि ६ मे २०२३ रोजी आपल्या यंत्रणेद्वारे लक्ष केन्द्रित केले. शिवपुराण कथेचे सकाळचे सत्र संपल्यातर, भाविक भक्त महिला पुरुष भोजना करीता भोजनालयाकडे जात असतांना, यावेळी होणाऱ्या गर्दीचा लाभ घेऊन, महिलांच्या गळ्यातील दागीने चोरतांना चोरट्या महिलांना रंगेहाथ पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळालं असून,चोरट्या महिलांमध्ये १ ) आशा हरिलाल धोबी रा.रेल्वे स्टेशन जवळ नागपूर २ ) मुज्जु देवी राजु धोबी रा.रेल्वे स्टेशन जवळ नागपूर ३) चंदा सोनु धोबी रा.रेल्वे स्टेशन जवळ नागपूर ४) अनिता सुरेश धोबी रा रेल्वे स्टेशन जवळ नागपूर ५ ) कमलेश सुरजलाल बावरीया रा.रेतीत नगर भरतपूर ( राजस्थान ) ह ) शशी रिकु बावरीया रा.रंतीत नगर भरतपूर राज्य (राजस्थान ) ७ ) कश्मिरा हिरालाल बावरीया रा.रंतीतनगर भरतपूर ( राजस्थान ) ८ )प्रिया संदिप उन्हाळे रा सावंगी मेघे जि वर्धा ९ ) सुरैय्या रामप्रसाद लोंडे रा सावंगी मेघे जि वर्धा १० ) लता किशन सापते भिमनगर इंदोर मध्यप्रदेश इत्यादी महिला चोरट्यांना अटक करण्यात येवून त्यांचेकडून काही दागीने जप्त करण्यात पोलीसांना यश मिळाल्याचे वृत्त असून पुढील तपास पोलीस अधिक्षकाच्या मार्गदर्शनात सुरू असल्याचे वृत्त आहे.भाविकांनी आपआपल्या दागीने,मोबाईल व पाकिटांवर लक्ष्य ठेवण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले असल्याचे वृत्त संजय कडोळे यांनी कळविले आहे.