कारंजा (लाड) :आर. जे. हायस्कूल व कॉन्व्हेंट चा वर्ग सहावीचा विद्यार्थी चिरंजीव आयुष विनोद गिरी यांनी पेरियॉडिक टेबल मधील 125 एलिमेंट्स चे क्रमावर पठण अवघ्या 40 सेकंद मध्ये करून आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वविक्रम केला. हा विश्वविक्रम इतर विश्वविक्रम पेक्षा वेगळा असून, यासाठी
आयुष विनोद गिरी याने विशिष्ट वेबसाईट वर पेरियॉडिक टेबल मधील 125 एलिमेंट्सच्या पठणाचा व्हिडिओ (40 sec) रेकॉर्ड करून अपलोड केला व पुढील सूचनेनुसार एक एक टप्प्यावर तो व्हिडिओ पुढे गेलेलाआहे .प्रसार माध्यमांच्या साहाय्याने त्याचा हा व्हिडिओ वर्ल्ड बुक रेकॉर्ड, येथे पोहोचला व त्याच्या या अद्भुत विक्रमाची नोंद घेत त्याचा गौरव करण्यात आला.
या साठी आयुष यास इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे प्रशस्ती पत्र सुवर्ण पदक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या विश्व विक्रमासाठी आयुष यास त्याचे आई सौ. योगिता, वडील श्री विनोदकुमार गिरी व शिक्षक श्री इंगोले सर यांनी मार्गदर्शन केले.
आयुष शाळेच्या अभ्यासक्रमात अव्वल असून होमी भाभा परीक्षेत पहिल्या व दुसऱ्या पात्रता फेरीसाठी त्याची निवड झाली होती.
कारंजा एज्युकेशन सोसाटीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सचिव श्री अमल भाऊ चवरे यांनी चि. आयुष विनोद गिरी याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.