कारंजा : कारंजेकर श्री गणेश भक्तांकडून, दिवसेंदिवस शाळूच्या पर्यावरणपूरक श्री गणेशमुर्त्याची वाढती मागणी बघून, कारंजा येथील प्रसिद्ध श्री गणेश मुर्तिकार बढोणे बंधु कुंभार, मनोज गोविंदराव बढोणे तथा पुरुषोत्तम गोविंदराव बढोणे कुंभार यांनी यावर्षी शासन निर्देषाचे पालन करीत, जास्तित जास्त चार फुटाच्या श्री गणेश मुर्तिचे निर्माण करीत, पर्यावरणपूरक शाळू मातीच्या श्री गणेश मुर्त्याच्या निर्माणावर भर दिल्याचे आढळून आले आहे. त्यांचे श्री गणेश मुर्त्याच्या निर्माणाचे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून सध्या रंगरगोटी करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले आहे .