गत अनेक वर्षांपासून कवडसा हा स्तंभ रविवारी लिहिणारे, पत्रकार प्रा.डॉ. मोहन खडसे यांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली द्वारा आयोजित राज्यस्तरीय साहित्य स्पर्धेमध्ये ,महामृत्युंजय वा;डमय पुरस्कार 2024 साठी प्रा.डाॅ. खडसे यांची "कवडसा"या ललित लेखनासाठी ,तृतीय पुरस्कार म्हणून निवड करण्यात आली आहे. येत्या 15 डिसेंबर रोजी एका शानदार समारंभात गडचिरोली येथे,मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ मोहन खडसे सन्मानित होणार आहेत. गडचिरोली येथील प्रसिद्ध नाटककार श्री चुडाराम बल्लारपुरे यांनी यासंदर्भात नुकतीच घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी परीक्षण एका विशिष्ट समितीने निरपेक्षपणे केले. या राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रमुख म्हणून योगेश गोहणे व प्रा.अरुण बुरे यांनी काम पाहिले.
या आधी प्रा. डाॅ. खडसे यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत ज्यामध्ये व्हॉइस ऑफ मिडिया , मुंबईच्या स्पर्धेत सकारात्मक लेखनासाठी राज्यस्तरीय पुरस्काराचा समावेश आहे.त्यांचे सर्व स्तरातून