ब्रह्मपुरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली असून ब्रह्मपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडतीनुसार तालुक्यात कोणत्याही पक्षाशी युती न करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्टीकरण ब्रह्मपुरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर यांनी माहिती दिली आहे.
याकरीता ब्रह्मपुरी तालुक्यातील वेगवेगळ्या ( आरक्षणा नुसार ) गणातील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांची चाचपणी सूरू असून त्या - त्या क्षेत्रात जाऊन संभाव्य दौरे सुरू करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर यांनी दिली आहे.