कारंजा : शिक्षण क्षेत्रातील यशस्वी ठरलेल्या , माळीपूरा कारंजा येथील, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा कारंजा येथे प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण, शालेय विद्यार्थ्याच्या विविध स्पर्धा, बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला . याप्रसंगी अध्यक्ष स्थानी रवि गाडगे (भारतीय सैनिक) जागृती कॅम्पुटरचे संचालक नितीन उजवणे सर त्याचबरोबर प्रसिद्ध विधीज्ञ आतिश चौधरी , राजेंद्र टोपरे सर , समाजसेवक सत्यजित गाडगे, गजानन सुळके ( माजी सैनिक ) शशिकांत वेळूकार , राहूल सु. इंगोले ( उपाध्यक्ष इंगोले शिक्षण प्रसारक संस्था ), सुनिलभाऊ डाखोरे इ . मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी गाडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खानंदे सर यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्याच्या सर्वांगीन विकासाकरीता विद्याथ्याच्या विविध स्पर्धाचे आयोजन केले असता,विद्यार्थ्यांनी विविध नृत्य अविष्कार व देशभक्तीपर गीत सादर केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मेडल देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन राठोड सर यांनी केले. असे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे .