सदर योजनेअंतर्गत ७२०० घरकुलांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी
३००० घरकुल हे फक्त जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातच मंजूर करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे इतर तालुक्यातील कोळी समाजातील कुटुंबांना त्याचा लाभ मिळाला नाही .
चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र-आंध्रप्रदेश सीमेवरील तालुक्यात राहणाऱ्या कोळी कुटुंबांना या योजनेचा प्राधान्याने लाभ मिळणे आवश्यक होते. १०x१० च्या खोलीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबाचे होत असलेले हाल हे पालकमंत्र्यांना सुद्धा माहिती आहे. तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून फक्त राजकीय स्वार्थाचा दृष्टिकोन पुढे ठेऊन निर्णय घेतला.
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना संपूर्ण जिल्ह्याला समान न्याय देण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांची होती, परंतु त्यांनी स्वतःच्याच मतदारसंघात संघात ३००० घरकुल मंजूर करून घेतल्याने जिल्ह्यातील इतर तालुक्यातील कोळी समाजातील कुटुंबासोबत अन्याय झाले आहे.
अन्यायग्रस्त या कुटुंबांना लवकर न्याय देण्यात यावे व इतर तालुक्यातील प्रस्तावित घरकुल तातडीने मंजूर करण्यात यावे, याबाबत आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळात मागणी केली.