ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष पदी आसाराम तिमाजी बगमारे यांची निवड करण्यात आली.
ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही ग्रामपंचायतीची आज दिनांक:- १९/०८/२०२२ ला सकाळी ११:३० वाजता ग्रामसभा सरपंच श्री. मनोज बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या ग्रामसभेत महात्मा गांधी रोजगार हमी योजना सन २०२३-२४ वर्षाचा कृती आराखडा व लेबर बजेट तयार करणे, विवीध शासकीय योजनाबद्धल माहिती देणे, या विषयावर नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली व नंतर महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे गठण करणेहा विषय ग्रामसभेसमोर ठेवण्यात आला.
यामध्ये गावातील सर्व उपस्थित नागरिकांनी ग्रामसभेत चर्चा करून गावातील प्रतिष्ठित आसाराम तिमाजी बगमारे यांचे नावं ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी सुचविले व महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समीती अध्यक्ष म्हणून आसाराम तिमाजी बगमारे याची निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामसेवक श्री.एच.बी.तलांडे, श्री.भास्कर गोटेफोडे उपसरपंच, श्री.ओमदेव ठाकरे सदस्य, श्री.वसंता बगमारे सदस्य, सौ.सुनिता मेश्राम सदस्या,सौ. संगीता ठाकरे सदस्या, सौ.माधुरी ढोंगे सदस्या, सौ.संदेशा गुरूनुले सदस्या, श्री.गुलाब ठाकरे कर्मचारी, गुलाब राऊत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक बाळकृष्ण शेंडे यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.