ब्रह्मपुरी/प्रतिनिधी:--
अल्हाज हजरत सय्यद मो. ईकबालशाह बाबा उर्फ बाबाजान कादरी चिश्ती, र. अ. चिंचोली (बू.), ता. ब्रम्हपुरी यांचा १७ वा उर्स मुबारक दिनांक २२ मार्च २०२२ रोजी हर्षोल्हासाने साजरा करण्यात येणार आहे. सदर दिवशी शाही संदल सांयकाळी ०५.३० वा. सज्जादा सांयकाळी ०५.३० वा. सजादा नशीन मो. शरीफ कादरी (अम्मा साहेबा यांचे निवासस्थान) यांचे वडसा स्थित मदीना मस्जीद, कमलानगर वार्ड येथून वडसा शहरातून गस्त करीत चिंचोली (बु.) दरगाह शरीफ येथे रात्रो ०८.३० वा पोहचेल व पाहुण्यांचे उपस्थितीत शाही चादर पेश केल्या जाईल. लगेच आम लंगर होईल.
या उर्सचे निमित्त साधून दिनांक २२ मार्च २०२२ रोजी विजयभाऊ वडेट्टीवार मंत्री, इतर मागास बहूजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, म.रा. तथा पालकंत्री चंद्रपूर जिल्हा, चिमूर-गडचिरील लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार, अशोक नेते, सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार, तथा महाराष्ट्र लोकलेखा समिती अध्यक्ष, बंटीभाऊ भांगडिया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र, किशोर जोरगेवार, आमदार चंद्रपूर, क्रिष्णाजी गजबे, आमदार,
आरमोरी निर्वाचन क्षेत्र, तसेच प्रकाश देवतळे, नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटी, शिवानी वडेट्टीवार नवनियुक्त महासचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, तुषार सोम, महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
नाम.विजय वडेट्टीवार, मंत्री महोदयाचे हस्ते तसेच पाहुण्यांचे उपस्थित रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा, दरबारी बांधवांचे गुणवंत विद्यार्थ्यांचा व दरबारी बांधवांचा पाहुण्यांचे हस्ते सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....