अकोला येथील विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अथर्व सतिश देशमुख याने इयत्ता दहाविच्या परीक्षेमध्ये ९४ टक्के गुण मिळवून प्राविण्याने यशस्वी होण्याचा बहूमान प्राप्त केला आहे.अथर्व हा जेष्ठ पत्रकार ,विश्वप्रभातचे संपादक संजय एम.देशमुख,कृष्णा व संदिप देशमुख यांचा पुतण्या तर सहसंपादक सतिश देशमुख निंबेकर यांचा मुलगा आहे.
त्याला संस्कृत या विषयात ९८,इंग्रजी व विज्ञानामध्ये सुध्दा याप्रमाणेच गुण मिळलेले आहेत. अभ्यासाशिवाय त्याला गायन कलेचा छंद असून गाण्यांचे अनेक व्हिडीओ बनविण्यातही तो अग्रेसर आहे.कमी वयामधील एक संवेदनशील विद्यार्थी आणि सोबतच क्रिकेटमध्येही सातत्याने अभिरूची जोपासणारा तो एक उत्तम क्रीकेटरही आहे.या प्राप्त यशाबद्दल आणि अष्टपैलू वाटचालीबाबत त्याचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.