ब्रम्हपुरी:-शहरातील प्रसिध्द व्यापारी व फिर्यादी नामे शब्बीरअली जेसानी यांचे मे. अली सिमेंट एजन्सी नावाचे हार्डवेअरचे दुकान असुन आरोपी व बांधकाम व्यावसायिक नामे मुनीश्वर रामकृष्ण सेठीये यांचे उज्वल कंष्ट्रक्शन कंपनी नावाने व्यवसाय आहे.
त्यामुळे आरोपी हे फिर्यादीचे नेहमीचे ग्राहक होते . अश्यातच आरोपीने फिर्यादीकडून ४२५ सिमेंट बॅग किंमत १,१०,५००, सलाख २२.५ क्विंटल किंमत ७०,७२०, वायर किंमत २६००, चिल्लर लोखंडी सामान किमंत ७४८० रुपये असे एकूण १,९१,३०० रुपयांचा सामान घेतले व त्याकरिता आरोपीने फिर्यादिला कॅनरा बँकेचा धनादेश दिला परंतु सदर धनादेश हा खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याच्या कारणास्तव अनादर झाला Cheque dishonor . त्यासंदर्भात फिर्यादीने आपल्या वकिला मार्फत आरोपीस नोटीस पाठविला परंतु तरीही आरोपीने रकमेची परतफेड न केल्याने शेवटी फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली. फिर्यादी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या भक्कम पुराव्याच्या आधारावर न्यायाधीशांनी आरोपी नामे मुनीश्वर सेठीये यांना परक्राम्य संलेख अधिनियमचे कलम १३८ आणि १४२ अन्वये दोषी ठरवत २,९२,००० रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई देण्याचे आदेशीत केले. सोबत आरोपीला १ वर्षाचा कारावास आणि नुकसान भरपाईची रक्कम न भरल्यास ६ महिन्याच्या वाढीव कारावासाची शिक्षा सुनावली.