काजळेश्वरचे युवा सरपंच नितीन पाटील विष्णुपंत उपाध्ये यांचा नुकताच लोकनेता पुरस्काराने सन्मान झाला.ग्रामविकास व नेतृत्व गुण सरपंच नितीन पाटील उपाध्ये यांचे कडे असल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार संघाचे कारंजा तालूका अध्यक्ष आरीफ भाई पोपटे; सर्वधर्म आपदकालीन संस्थेचे प्रमुख श्याम सवाई पी एल प्रणीत ग्रामीण पत्रकार संघाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष अशोकराव उपाध्ये; काजळेश्वरचे ग्रामविकास अधीकारी सतीष वरघट साहेब; ख वि संघाचे संचालक विनोद पाटील उपाध्ये ; पत्रकार नकुल उपाध्ये यांनी त्यांचा दि . २२ ऑगष्ट रोजी कारंजा येथे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला . याप्रसंगी बोलतांना आरीफ भाई म्हणाले की नितीन पा . उपाध्ये यांचे कडे संघटण कौशल्य असून स्वच्छ मनाचा निस्वार्थ वृत्तीचा सतगुण आहे . त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठया प्रमाणात आहे . सामान्य मानसाचे काम व्हावे ही वृत्ती त्यांचे कडे असल्याचे मत वन कॉल वन सेकंद ने अनेकांचे प्राण वाचविणारे प्राण रक्षक श्याम भाऊ सवाई म्हणाले . प्रास्ताविकातून अशोकराव यांनी त्यांच्या कार्यासाठी त्यांना शुभ चिंतले . माझ्या कडून जेवढे लोकांचे उपयोगी पडण्याचे काम इश्वर करून घेईल तेवढी शक्ती त्या सर्वशक्तीमान देवाकडे मी मागतो असे सत्काराला उत्तर देतांना नितीन पा उपाध्ये म्हणाले . कार्यक्रमाचे संचलन व आभार नकूल उपाध्ये यांनी केले .