कृषी दिन व वैद्यक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर यांच्या वतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या *विद्यापीठ हायस्कूल, पुणे* येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कृषी दिनानिमित्त प्रशालेच्या आवारात बकुळीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणात्मक संदेश देणारे भेटकार्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेतील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दैविक कारीया याच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक जाणीव निर्माण व्हावी. यासाठी डॉ. शेखर बेनाडे व डॉ. रूपाली बेनाडे यांनी आयुर्वेदाचे जीवनातील महत्त्व तसेच योग व प्राणायाम यांचे महत्त्व व्याख्याना द्वारे विद्यार्थ्यांना पटवून दिले. याप्रसंगी *प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे* यांनी प्रास्ताविक तर आभार गौरी गोळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली सैंधाणे यांनी केले. रोटरी क्लब अध्यक्ष प्रिया कारीया, रिसोड रिसबूड, रूपाली जगताप, कॅप्टन नारकर, जिग्नेश कारीया, सपना आगरवाल, मीनाक्षी दुसाने, शामला सुरेश, गिरमे, अर्चना, प्रशालेतील शिक्षक स्नेहा वाघमारे, संध्या आवेकर, मनोहर निकम, तेजस्विनी निरगुडे, रेश्मा देवकाते, योगेश्वर चव्हाण, अभंग पल्लवी उपस्थित होते.