वाशिम : केन्द्र आणि राज्य शासनाने प्रत्येक योजनेच्या लाभासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून,त्यांना दररोजच्या रोजी रोटी करीता मजूरी करण्याचे सोडून,शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळविण्याकरीता आधार कार्डाला मोबाईल क्रमांक अपडेट करण्याकरीता आणि राष्ट्रिय व सहकारी बँकेत लाभार्थ्यांच्या बचत खात्याच्या केवायसी ; ई केवायसी करण्यासाठी भाग पाडले. शासनाने आज रोजी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती लाभासाठी विद्यार्थ्यांना ; पि. एम.किसान योजनेच्या ; पिकविम्याच्या ; दुष्काळी पैशाकरीता शेतकऱ्यांना ; लाडकी बहीण योजनेसाठी महिला मंडळीना ; श्रावण बाळ वृद्धापकाळ निवृत्ति वेतन योजनेच्या आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी, स्वयंपाकाच्या गॅस व रेशनकार्ड वरील मोफत धान्य योजनेकरीता वयोवृद्ध व निराधार व सर्वच मध्यमवर्गीय व गोरगरीब लाभार्थ्यांना त्यांचे आधार कार्ड बँकेत जाऊन प्रमाणिकरण करण्याचे सांगून,त्यांना पोटासाठी रोज मजूऱ्या करण्याचे कामधंदे सोडून अक्षरशः रस्त्यावर आणलेले आहे. आज आधार केन्द्रावर जाणाऱ्या लाभार्थ्याकडे मतदार कार्ड नसल्याने,जन्मतारखेचा पुरावा म्हणून कोतवाल बुकाची नक्कल उपलब्ध नसल्यामुळे किंवा हाताची ठसे (फिंगर प्रिन्ट) येत नसल्याने,वयोवृद्ध निराधाराजवळ स्वतःचे मोबाईल नसल्यामुळे त्यांचे आधार कार्ड प्रमाणिकरण होत नाही.सर्वच राष्ट्रीय किंवा सहकारी बँकामध्ये मॅनपॉवर्स उपलब्ध नसल्यामुळे आणि इंटरनेट कनेक्शन चालू रहात नसल्यामुळे केवायसी किंवा ई-केवायसी होऊ शकत नाही. त्यासाठी वस्त्या वाड्या व गाव खेड्यातील ग्रामस्थ जनतेला दररोज तालुक्याच्या ठिकाणी आधार केन्द्र आणि स्टेट बँक, सेन्ट्रल बँक, बडोदा बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दररोज व वारंवार स्वतःची रोजमजूरी सोडवून उपवासी तापासी फेऱ्या माराव्या लागतात. दररोज सात आठ तासात बँकेच्या रांगेत उभे रहावे लागते.कामाच्या बोज्याने आधार केन्द्र आणि राष्ट्रिय बॅकातील अधिकारी कर्मचारी लाभार्थ्यांना कोणतीही सहकार्याची भूमिका न घेता, उद्धटपणाची व असभ्य अशीच वागणूक देत आहेत. व नाईलाजाने आधार कार्ड अपडेट न झाल्याने आणि बँकेमध्ये बचत खात्याची केवायसी ई केवायसी न झाल्याने शेवटी खऱ्या व गरजू लाभार्थ्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे.त्यामुळे केन्द्र व राज्य शासनाने प्रत्येक योजनेचा लाभ देण्याच्या नावावर सर्वसामान्य जनतेची प्रतारणा - सर्वसामान्य नागरीकांचा अपमान करणेच सुरू केले आहे.त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, लाडक्या बहिन योजनेच्या लाभार्थी महिला मंडळी, वयोवृद्ध व निराधार मंडळी त्रस्त झाले असून, शासनाने लाभाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी आधार कार्ड प्रमाणिकरण आणि राष्ट्रिय व सहकारी बँकेच्या केवायसी - ईकेवायसीच्या नियम व निकषात त्वरीत बदल करून, बँकामधील कर्मचारी संख्या म्हणजे मॅनपावर्स वाढवून लाभार्थ्यांच्या वेळेचे महत्व जाणून सेवा दिली तर ठिक. अन्यथा त्रस्त लाभार्थी नागरिकांना होणाऱ्या मनस्तापाने आणि त्यांच्या श्रापाने आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये महायुती सरकारला पायऊतार व्हावे लागणार असल्याचा निर्वाणीचा इशारा,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी शासनाला दिला आहे.