पौराणिक काळात करंजऋषी यांनी स्थापन केलेल्या , कस्तुरी सुंगधानी पुनित असलेले, सर्वधर्मियांच्या पवित्र संगमाचे, गुरुदत्ताचे जन्मस्थळ, जैन धर्मियांचे दुर्मिळ तिर्थक्षेत्र, हिदंवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना सुद्धा स्वराज्याकरीता ज्या शहराची भुरळ पडावी असी नगरी आणि शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारंजा नगरीत, शांती सलोखा एकोपा नांदावा .
व त्यासाठी स्थानिक नागरिकांची साथ किंवा सहकार्य लाभावे म्हणूनच कारंजा शहर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष - शिस्तप्रिय आणि हजरजवाबी पोलिस निरिक्षक आधारसिह सोनोने यांनी नेहमीच पत्रकारांमार्फत नागरिकांशी समन्वय साधीत, कर्तव्य पार पाडण्यावर आपला भर दिलेला आहे.
यंदा आजपर्यंत न घडलेला पत्रकरांसाठी दिपावली स्नेहसंमेलन आयोजीत करून त्यांनी पत्रकारांमार्फत नागरिकांना शांती सलोखा व शहराचे पावित्र्य राखून, आनंदोत्सवाने दिपावली साजरी करण्याकरीता भरभरून शुभेच्छा दिल्या . व वेळोवेळी पत्रकाराकडून मिळणाऱ्या सहकार्या बद्दल आभारही मानले .
यावेळी पत्रकारांना मिठाईचे वितरण सुद्धा करण्यात आले . याप्रसंगी सर्वच पत्रकार संघाचे वृत्तपत्राचे पत्रकार आवर्जून उपस्थित होते. असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .