स्थानिक गुन्हे शाखेची चमू हिंगणघाट परिसरात गस्तीवर असताना मालवाहू वाहनातून 3 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई बुधवार 12 रोजी रात्री करण्यात आली.गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाट-सातेफळ मार्गावर नाकेबंदी केली. दरम्यान, मोहम्मद नईम शेख मुनाफ (33) रा. सेंट्रेल वार्ड, हिंगणघाट आणि एका अल्पववयीन बालकाला ताब्यात घेतले. मालवाहू गाडीची झडती घेतली असता 3 किलो गांजा आढळून आल्याने मालवाहू गाडी, मोबाईल, असा 2 लाख 26 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलिस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, श्रीकांत खडसे, रामकिसन इप्पर, पवन पन्नासे, नितीन इटकरे यांनी केली.