कामरगाव : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)चालू आठवड्यातील पावसाच्या आनंदी वातावरणाने उत्साहित झालेल्या, कामरगाव येथील ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याकरीता,तालुक्यातील वसुंधरा बहुउद्देशिय संस्थेच्या अर्थात वसुंधरा टिमच्या पुढाकारातून,वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात येऊन,मानवी जीवनाला पुरेसा प्राणवायू (ऑक्सिजन) देणाऱ्या आरोग्ययुक्त औषधी झाडांसह, फळझाडे व फुल झांडाची रोपे सार्वजनिक जागा पाहून आणि मुख्यतः सेवा सहकारी सोसायटी कामरगावच्या प्रांगणात लावण्यात आली. या सामाजिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.श्रीधर पाटील कानकीरड हजर होते. तर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून वसूंधरा बहुउद्देशिय संस्था तपोवन कारंजाच्या अध्यक्षा, वनश्री निताताई लांडे,अवताडे, शाखाधिकारी राठोड,निरीक्षक बांडे,सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य प्रशांत लकडे,नरेंद्र देशमुख,आ.रशीद अ.खलील, सचिव मनिष कानकिरड,हिम्मत मोहकर , प्रदिप मेहरे, रविंद्र मूंदे भास्कर पवार,शंतनू उपाध्ये, पंकज मलमकर,आशिष राखोंडे, धर्माजी तायडे,दत्ता म्हसके,राजूभाऊ मूंदे,गौरदिप कांबळे,उमेश पवार,कांबळे भाऊ इत्यादी ग्रामस्थांची उपस्थित होती.पर्यावरणासह मानवी जीवन वाचविण्याकरीता,प्राणवायू (ऑक्सिजन) वाचविणे ही आधुनिक काळाची गरज असून, त्याकरीता संत तुकाराम महाराजांनी सांगीलेला"वृक्ष वल्ली आम्हा सोयचरी वनचरे ही." हा अभंग प्रत्येक मानवाने आपल्या हृदयात कायम ठेवून वृक्षाची लागवड आणि संवर्धन करण्यावर भर देण्याची गरज आहे." आवाहन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर पाटील यांनी व्यक्त केले.सर्वच उपस्थितांनी यावेळी वृक्षलागवड केली.कार्यक्रमाचे आभार मनिष कानकिरड यांनी केले.असे वृत्त हिंमत मोहकर यांनी कळविले आहे.