कारंजा :-शुक्रवार दि.08 डिसेंबर 2023 रोजी अतिप्राचिन, ऐतिहासिक,धार्मिक,आध्यात्मिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,व्यापारी आणि एकेकाळच्या जगप्रसिद्ध बाजारपेठेच्या नगरीमध्ये दत्तउपासकांचे जगप्रसिद्ध श्री. नृसिह सरस्वती स्वामी यांचे "अ" श्रेणी तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त श्री. गुरुमंदिर आणि जैनांची जगप्रसिद्ध मंदिरे आहेत.त्यामुळे ह्या शहराचा तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास आराखडा मंजूर करून शासनाने त्वरीत विकास कामे सुरु करावीत.

ह्या आग्रही मागणीकरीता सर्वधर्मिय कारंजेकरांनी एकवटून विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या माध्यमातून प्रभारी ना. तहसिलदार विनोदजी हरणे यांचे मार्फत माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया यांचे प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांचे नेतृत्वात महाराष्ट्र शासनाला निवेदन दिले.यावेळी माजी नगरसेवक प्रसन्न पळसकर, राजीक शेख,प्रदिप वानखडे, उमेश अनासाने,रुग्नसेवाव्रती समाजसेवक श्याम सवाई,से. नि.प्राचार्य माणिकराव नागरे,डॉ. गजानन गावंडे,विनायक पद्मगिरवार,कैलास हांडे,यशवंत पद्मगिरवार,माणिकराव हांडे, महादेवराव ठोंबरे,अश्विन जगताप,श्याम घारू,रामेश्वर डेंडूळे,अँड.सौ.मंगला नागरे,सौ. छाया गावंडे,सौ.शारदा भुयार,सौ.वंदना ठोंबरे,सौ. कृपाताई ठाकरे,सौ.मोनाली गणवीर,पत्रकार विनोद गणवीर,रमेश ढेणवाल,आनंद सारवण,संजय गोहर,भगवान संदेले, संतोष गोहर, आनंद राजोरीया,महेश अहेरवार,दाऊद मुन्निवाले,इत्यादी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी प्रभारी ना . तहसिलदार विनोद हरणे यांना तिर्थस्थळ कारंजाचे महत्व पटवून देत "भावी पिढीच्या भविष्यासाठी, ऐतिहासिक कारंजा नगरीला महाराष्ट्र शासनाने तिर्थक्षेत्र घोषीत करून तिर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत येथील विकासकामे सुरु होणे गरजेचे असल्याचे माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया यांनी सांगीतले.
आपल्या मनोगतातून माजी नगरसेवक प्रसन्न पळसकर यांनी तसेच अँड सौ. मंगला नागरे यांनी, "गुरुमाऊलीच्या कारंजा नगरीचा तिर्थक्षेत्र विकासा सोबतच तालुक्यातील सोहळ काळवीट अभयारण्य पहाता पर्यटन आणि औद्योगीक विकास होणे आवश्यक असल्याचे सांगीतले तर महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग समाजसेवक संजय म्हणाले, "तिर्थक्षेत्र विकासाकरीता सर्वधर्मिय कारंजेकर एकवटले असून शासनाने आता अविलंब तिर्थक्षेत्र विकास आराखडा त्वरीत तयार करावा अन्यथा आम्हाला वेळप्रसंगी तिव्र आंदोलन करावे लागेल." असे वृत्त विदर्भ लोककलावंत संघटनेकडून प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....