अकोला--एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन त्या ध्येयपूर्तीच्या दिशेने असंख्य परिस्थितीवर मात करीत बबनराव कानकिरड यांनी वाटचाल केली म्हणून त्यांच्या बाबतीत म्हणावेसे वाटते.."देखणी ती पाऊले जी ध्यास पंथी चालती ".असे प्रतिपादन से.नि. उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे यांनी केले.
श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखेत बबनराव कानकिरड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. मुख्याध्यापक विजय ठोकळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.लेखिका डॉ. निर्मला भामोदे,शीघ्रकवी हि.रा. गवई, अमरसिंह देशमुख, पराग ठाकरे व डॉ.सौ.ज्योत्स्ना कानकिरड यांची प्रमुख उपस्थिती होती.
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल बबनराव कानकिरड यांचा शिव परिवाराच्या वतीने शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
डॉ. ज्योत्स्ना कानकिरड यांचा डॉ. निर्मला भामोदे यांनी साडी-वस्त्र भेटवस्तू देऊन सत्कार केला.
शैक्षणिक,सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील प्रेरणास्थान स्व.डॅडी देशमुख यांच्या प्रेरणेने श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या ज्ञानपंढरीत सेवार्पण केली. यापुढेही "शाळा माझी - मी शाळेचा"हे बंधन कायम ठेवून पर्यावरण,अंधश्रद्धा निर्मूलन ,वाचन चळवळीत काम करणार असल्याचे भावपूर्ण प्रतिपादन बबनराव कानकिरड यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
याप्रसंगी संदीप पारसकर , हि.रा. गवई, डॉ. निर्मला भामोदे यांनी समयोचित भाषणातून कानकिरड सरांच्या शैक्षणिक-सामाजिक कार्याचा गौरव केला.
कानकीरड सर हे आनंददायी शिकवणारे शिक्षक होते.शालेय शिक्षणासोबतच मुक्त विद्यापीठाचे " ज्ञानगंगा घरोघरी " हे ब्रीद सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निरंतर धडपड केली. त्यांनी शाळेचे ऋणानुबंध असेच कायम ठेवावे असे प्रतिपादन विजय ठोकळ यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
याप्रसंगी फोटोग्राफर अजय जागीरदार यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ कविता फाटे यांनी केले.
सर्वश्री संजय धोत्रे,प्रवीण कोल्हे,संदेश दीक्षित,अंकुश देशमुख, सौजन्य कंकाळ, नीलकंठ महल्ले,रोशन वाकोडे, सौ कौशिका ठाकरे ,अर्चना ठोकळ, शुभांगी गावंडे, अंजली बोंडे, ऐश्वर्या देशमुख ,ग्रंथपाल सुमती पाचडे, वैष्णवी लांडे,छाया ठाकरे,नीलिमा ठाकरे, विद्या वसु, सविता पाटेकर, भारती भटकर, मेघा कावरे, स्वप्नाली तेल्हारकर,जयश्री पाथ्रीकर, रंजना देशमुख, सीमा रावणकर, प्रकाश वाकोडे, राजेश तायडे, दिलीप चव्हाण, सुनील खरे,उषाताई अहेरवाल यांचे सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी केक कापून व बलून उडवून सरांना भावपूर्ण निरोप दिला.राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....