वाशिम : यापूर्वी अलिकडच्या काळात वीस पंचवीस वर्षापूर्वी राज्याने मराठवाडा, विदर्भाच्या अनेक भागात कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती अनुभवलेली होती.त्यामुळे शासनाकडून शेगाव नगरीत कृत्रीम पावसाची यंत्रणा उभारून विमानांद्वारे ढगांवर रसायणांचा मारा करून कृत्रिम पावसाचे अशस्वी प्रयोग झाले. परंतु हवा तेथे दुष्काळग्रस्त भागात पाऊस पाडताच आला नाही. तेव्हापासून मराठवाडा कोरड्या दुष्काळासाठी ओळखला जात होता.सद्यस्थितीत उन्हाळ्यातील तापमानाचा पारा ५० अंश सेल्सियस एवढ्या उच्चांकावर पोहोचल्यामुळे माणसाला प्रचंड उष्णतेचा सामना करण्याची वेळ आलेली होती.ऋतूचक्र बदलल्यामुळे पुरेसा पाऊस होणार की नाही याची प्रत्येक जण चिंता करीत होता.
मात्र राज्यात यंदा प्रथमच ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असून, आज रोजी पावसाचे महासंकट उद्भवले असून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतजमीनी तील पिके एकतर खरडून गेली आहेत किंवा आहे ते पिक निकृष्ट झाले आहे, शिवाय अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे खेडोपाडीचे गावच्या गाव,घरे दारे,गुरे ढोरे, शेळ्या, मेंढ्यांचे नुकसान झाले आहे. तरी देखील पर्जन्यराजा शांत झालाच नाही.आता पुन्हा आज दि.२६ सप्टेंबर पासून,पुढील पाच दिवसात आपल्या परिसरात सर्वत्र भयंकर पाऊस होण्याची शक्यता आहे.बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी,ढगफुटी तसेच वीजा पडण्याची शक्यता आहे,त्यामुळे या दिवसात नागरिकांनी अगदी सकाळी सकाळी आणि दुपार नंतर शेतात जाऊ नये. शेतात थांबू नये. गुरेढोरे,शेळ्यामेंढ्या मोकळ्या सोडू नये.कच्ची घरे व झोपडी पालावर राहणाऱ्या आणि नदी काठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी गावातील शाळा, सभागृह, मंदिर मस्जीदीत आसरा घ्यावा,उंच ठिकाणी,डोंगरमाथ्यावर, मोकळ्या जागेत जाणे टाळा, झाडाखाली उभे राहू नका, तिर्थक्षेत्राचा किंवा बाहेर गावचा प्रवास टाळावा.आज उद्भवलेली महासंकटाची परिस्थिती पाहून एकमात्र अनुमान काढता येते की निश्चितच अंतराळातील मानवाच्या वाढत्या हालचाली, अणुबॉम्बचे विनाशक प्रयोग, जंगल तोड,पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे निश्चितच हा निसर्गाचा महाभयंकर कोप असला पाहिजे. यापुढे आता तरी माणसाने शहाणे व्हावे. निसर्ग व पर्यावरणाची हानी टाळावी. आपण सतर्क,राहून स्वतःचे व कुटुंबाचे प्राण वाचवले पाहिजे. आणि म्हणूनच दि.२६ ते ३० सप्टेंबर अतिवृष्टीच्या मिळालेल्या महासंकटाबाबत सावधगीरी बाळगावी व ग्रामस्थ, शेतमजूर, वयोवृद्ध, दिव्यांग, गोरगरीबांनी एकमेकांना मदत करावी. समाजसेवी व्यक्तिमत्वांनी या आपात्कालिन महासंकटात गरजूना स्वयंसेवा द्यावी. तर धनिक,उद्योजक, व्यापारी, अधिकारी इत्यादी मोठ्या दानशूरांनी आज जगाचा पोशिंदा बळीराजाच संकटात सापडल्याने शेतकरी व शेत मजूरांना, अन्नधान्य, जीवनावश्यक किराणा, कपडे, ब्लँकेट वाटपाची मदत करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी मित्र दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.
.
आपल्या प्रतिक्रिया द्या....