कारंजा (लाड) : मागील उन्हाळ्यात शास्त्रज्ञानी केलेले "अल-निनो" कोरड्या दुष्काळाचे सर्व अंदाज चालू वर्ष साफ चुकीचे ठरले असून,चोहीकडे बऱ्यापैकी पाऊस कोसळला. एवढेच नव्हे तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि चक्रीवादळाच्या परिणामाने वारंवार ढगाळ वातावरण तसेच शित लहरी निर्माण होऊन नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात तापमानाचा पारा घसरून हवामानात अचानक चढऊतार निर्माण होत आहे.परिणामी रुग्नालयातील रुग्नसंख्येत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ होतांना दिसत असून, सर्दि पडसे, दमा खोकला,मलेरीया,टायफाईड,डेंग्यु आदी आजारांचे प्रमाण वाढलेले आहे.नव्हे आणखी वाढणार आहे.त्यातच परत एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ची निर्मीती झाल्याची चर्चा असून, कोरोना रुग्न संख्या वाढत असल्याचे आकडे पुढे येत असल्यामुळे आणि कोरोना बद्दलच्या बातम्या वाढत असल्याने हा विषय आपल्या गावातील सुजाण नागरिकांनी सुद्धा गांभीर्याने घेणे आवश्यक झाले आहे.म्हणूनच भविष्यात आपल्या गावात परत एकदा नाकाबंदी,जमावबंदी किंवा संचारबंदी येऊ नये.आणि नागरिकांवर वैद्यकिय पथकाच्या नजरकैदेत (क्वारंटाईन) जाण्याची वेळ येऊ नये.म्हणून प्रत्येक नागरिकांनी दक्षता घेऊन, आपआपल्या कुटूंबातील गंभीर रुग्न, दुर्धर आजारग्रस्त, दिव्यांग, लहान बालक,गरोदर स्त्रीया आणि वयोवृद्ध नागरिकांची विशेष काळजी घ्यावी.त्याकरीता डेटॉलने आंघोळ, वारंवार साबणाने हात धुणे,गर्दीत जाणे टाळणे,मास्क वापरणे, पिण्याकरीता कोमट पाणी, आयुर्वेदिक काढा,थंडीपासून शरिराचा बचाव इत्यादी काळजी घ्यावी आणि महत्वाचे म्हणजे आजाराची बारिक सारीक लक्षणे आढळताच आपल्या फॅमिली डॉक्टरांकडूनच तपासणी करूनच औषधोपचार सुरू करावा.असे विनम्र आवाहन,करंजमहात्म्य परिवाराचे,दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कारंजेकरांकरीता केले आहे.