कारंजा : भारतिय संस्कृतीमधील सणांचा राजा "दिपावली" म्हणजे समाजामध्ये आनंद वाटण्याचा महत्वाचा सण उत्सव. "पत्रकार" म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असे नेहमीच म्हटले जाते.परंतु ते केवळ औचित्य म्हणूनच असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एरवी कारंजा शहरात पत्रकारांचा उपयोग विविध लोकप्रतिनिधी,नेते आणि राजकिय पक्षांकडून केवळ स्वतःची प्रसिद्धी मिळविण्या करीता फक्त स्वस्वार्थ साध्य करण्यापुरताच केला जातो. त्यामुळे केवळ पत्रकारांना बातम्या पाठविण्याचा गोरख धंदा येथे चालत असतो. व स्वतःच्या बातमीच्या प्रसिद्धी पुरते पत्रकारांना फोन केले जातात. बाकी कारंजा शहरात कोणत्याच लोकप्रतिनिधी किंवा राजकिय पक्षाकडून ना केव्हा पत्रकारा करीता "पत्रकार परिषद" किंवा ना कधी "पत्रकाराचे स्नेहसंमेलन" भरविले जाते.एवढेच काय दिपावली सारख्या भारतिय संस्कृतीतील सर्वात मोठ्या सणाला सुद्धा पत्रकारांना शुभेच्छा दिल्या जाऊ नये. त्यांची दिवाळी गोड व्हावी याची जाण लोकप्रतिनिधींनी ठेवू नये.यापेक्षा पत्रकाराची उपेक्षा काय असणार ? मात्र आता पत्रकारांनी सुद्धा जागे होणे गरजेचे असून,गटा तटाच्या किंवा मतभेदाच्या भानगडीत न पडता पत्रकारांचे अस्तित्व टिकविण्याकरीता सर्वच राजकिय लोकप्रतिनिधी,नेते व राजकिय पक्षांना धडा शिकविण्याकरीता यांच्या बातम्यांवर बहिष्कार टाकून,येणाऱ्या निवडणूकांमध्ये यांना यांची जागा दाखविणे जरूरी आहे असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.