ब्रम्हपुरी:-
_तालुक्यातील निलज येथे खास कार्तिक गोपालकालानिमित्त श्री गणेश दत्त नाट्य रंगभूमी, निलज यांच्या वतीने ईश्वर धकाते लिखित "लेक श्रीमंताची" या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आलं होते. या नाटकाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
या नाटकाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खेमराज तिडके अध्यक्ष ता.काँ.क.ब्रम्हपुरी उपस्थित होते. कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून डॉ. नामदेव किरसान महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, उपाध्यक्ष म्हणून अण्णाजी ठाकरे बाबुसाहेब रुई, प्रभाकरजी सेलोकर सभापती कृ.उ.बा.स. ब्रम्हपुरी, प्रा. डॉ. राजेश कांबळे माजी जि. प. सदस्य, डॉ. महेश कोपुलवार, उमेश धोटे सरपंच चौगाण उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून सुरज चौधरी पंतप्रधान युवासंसद 2023, उत्तम बनकर मा.अध्यक्ष से.स.सो.रूई, नानाजी तुपट मा. अध्यक्ष किसान काँग्रेस सेल ब्रम्हपुरी, सुरज मैंद पोलीस पाटील निलज तर प्रमुख अतिथी म्हणून विलास धोटे धान्य व्यापारी रुई, रघुनाथ सोंदरकर मा.सैनिक, देवचंद ठाकरे, प्रफुल ठाकरे ग्रा.प. सदस्य खरकाळा, संजय भुते से.स.सो., लोकनाथ पिलारे, शंकर कोपुलवार उपसरपंच निलज, कल्पना मांढरे ग्रा.प. सदस्या निलज, जान्हवी पिलारे ग्रा.प. सदस्या निलज, वैभव ढोरे धान्य व्यापारी खरकाळा,, ज्ञानेश्वर ठाकरे रुई, राहुल मैंद वार्ताहर, केशव मैंद ग्रा.प. सदस्य निलज, दादाजी भर्रे, संजय वाकडे, विलास ठाकरे, सुचित्रा ठाकरे, नारायण भुते, तारकेश्वर मैंद, वसंता ठाकरे, गजानन भोयर, सुखदेव बनकर समाज कल्याण, प्रेमलाल धोटे ठेकेदार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते._
या नाटकाच्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, आपल्या धार्मिक परंपरेमधे कार्तिक पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कार्तिक पौर्णिमेला "देव दीपावली"म्हणूनही संबोधले जाते. कार्तिक पौर्णिमेचा दिवस खूप शुभ मानला जातो. या शुभदिनी आपण गावात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी जे गावच्या कलाकारांनी जे नाटकाचे आयोजन केले आहे ते केवळ मनोरंजनासाठी नसून या नाटकाच्या माध्यमातून आपल्याकडे असणारी नाट्य संस्कृती, परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात. हे खरच अभिमानास्पद बाब आहे._
_कार्तिक पौर्णिमेला खास कार्तिक गोपालकालानिमीत्त श्री गणेश दत्त नाट्य रंगभूमी, निलज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नाटकाचा निलज येथील जनतेने आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले._
आपल्या प्रतिक्रिया द्या....