अकोला -११ मार्च १६८९ रोजी पन्हाळगडावरून औरंगजेबाने त्यांची निघृण हत्या केली, परंतु त्यांच्या बलिदानाने हिंदवी स्वराज्याचा विजय अधिक सशक्त केला. “त्याग, निष्ठा आणि पराक्रम यांचा अमर संदेश देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस डाबकी रोड येथे साजरा करण्यात आला.यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचा 11 मार्च हा बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो कारण हाच दिवस आहे ज्या दिवशी छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी पंधरवड्याहून अधिक काळ मुघल राजा औरंगजेबाने दिलेल्या भयंकर यातना सहन करून स्वराज्य स्थापनेसाठी प्राणाची आहुती दिली अशी माहिती आपला माणूस डॉ अशोक ओळंबे यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन उमेश जानोरकर यांनी केले होते कार्यक्रमाला डॉ अशोक ओळंबे प्रकाशभाऊ फाटे शशिकांत चोपडे उमेश जानोरकर अनिकेत गांगलवार मनोज ढोले नारायण रत्नपारखी विकी मेहरे राम भारती बल्लू पजई अमित भिरड शुभम टोम्पे विकी दुर्गीया निखिल इंगळे मिश्राजी ए एस मोटर्स संचालक यांचेसह डाबकी रोड येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.