ब्रम्हपुरी/
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेतृत्व व कार्यप्रणाली वर विश्वास ठेऊन,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे ब्रह्मपुरीच्या दौऱ्यावर आले असता ब्रम्हपुरी नगरपरिषद कुर्झा प्रभाग क्र.01(एक) वार्डातील किरण फटिंग यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच युवकांनी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे.
कुर्झा वार्डातील रमेश जिभकाटे, किशोर बावनकुळे,राकेश वैद्य, राजू बावनकुळे, कुलदीप चिलबुले, दुर्गेश पिसे,शुभम थोटे,शरद टिकले ,वैभव पडोळे, प्रवीण जिभकाटे, अनिकेत उराडे, आकाश फटिंग,समीर जिभकाटे, संदीप टिकले, योगेश लांजेवार, कुणाल बावनकुळे, रुपेश टिकले, गोलू दिवटे, चेतन लाखे, पिंटू भुरे, तेजस उराडे, परिस खेत्रे, वसंता खेत्रे,उमेश बावनकुळे व अन्य कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.
सर्व युवा कार्यकर्ते यांच्यावर भाजपा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पक्षाचे दुप्पटे देऊन सत्कार केले.या कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या सोबत विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अशोक नेते, ब्रह्मपुरीचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, लोकसभा संयोजक किसन नागदेवे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, देवरीचे माजी आमदार संजय पुराम, चंद्रपूर भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे,व अन्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....