स्टेम पोदार लर्न आणि पोदार जंबो किड्स येथे नेहमीच विविध सण उत्साहाने साजरे करण्यात येतात.धर्म हा भारतातील आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून सणाला मुलांना स्वतःबद्दल, समाजाबद्दल आणि जगाबद्दल शिकवण्याची संधी देण्यात येते.
नवरात्र नवरत्ने किंवा नऊ दागिने देण्याच्या स्वरूपात साजरी केली जाते, ती म्हणजे "नवरत्न - नऊ बुद्धिमत्ता".
हा कार्यक्रम मुख्याध्यापक प्रवीण ढोले सर आणि पोदार जंबो किड्सच्या मुख्याध्यापिका कु. प्रीती काळबांडे मॅम यांच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाखाली पार पडला, मुलांनी उत्साहाने गरबा आणि दांडिया सादर केला आणि हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्यासाठी खूप मेहनत घेतली. नृत्य शिक्षिका कु. कोमल यांनी मुलांना प्रशिक्षण दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुलांनी गरबा पूर्ण समर्पणाने पार पाडला. विद्यार्थी आणि पालकांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे होती, या शानदार कार्यक्रमाचे जज श्री आशिष सर होते.
एका अविस्मरणीय कार्यक्रमाने पालक भारावून गेले आणि अविस्मरणीय कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पोदार लर्न स्कूल व पोदार जंबो किड्स चे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रगती डांगे, चिंकल नंदनवार, शुभांगी बोरकर , रेश्मा मासुरकर, उमेशकुमार राऊत, प्रसनजीत कोल्हे, राहुल सातपुते, प्रशासकीय अधिकारी सुमित चक्रवर्ती आदींनी सहकार्य केले.