कासंडी या नावातच शेतकऱ्याची नाळ जोडलेली आहे - आमदार अमोल दादा मिटकरी
कासंडी अनिल मालगे व्दारा निर्मित चित्रपटाचा शुभारंभ
अकोला - जगामध्ये कुठही तीर्थ करायला जा त्यापेक्षा जास्त पुण्य आई-वडिलांची सेवा करून
मिळते आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे असे मत अकोला पश्चिम चे लोकप्रिय आमदार साजिद खान पठाण यांनी कासंडी या सिनेमाच्या शुभारंभ प्रसंगी काढले. तसेच प्रा. स्वर्गीय तुकाराम भाऊ बिडकर यांचे बॉडीगार्ड प्रकाश तायडे हे निर्माता व त्यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे अनिल मालगे यांच्या संकल्पनेने हा सिनेमा तयार होत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले अशा कार्यकर्त्यांमुळेच नेत्यांचे नाव अजरामर राहत असल्याचे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केले
कासंडी या सिनेमाचा शुभारंभ आमदार साजिद खान पठाण आमदार अमोल दादा मिटकरी यांच्या हस्ते आर डी जी कॉलेज येथे सिनेमाचे
टेक क्लाप दाखवून करण्यात आला. यावेळी आमदार अमोल दादा मिटकरी यांनी शेतकऱ्यांची नाळ जोडलेला कासंडी हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असतेच कासुंडीमुळेच शेतकऱ्यांच्या जनावरांचे विषारी साप व चोरांपासून रक्षण होते. बैलाच्या गळ्यातली घंटी मुळे
चोर सुद्धा वावरात यायला घाबरतात विषारी साप सुद्धा जवळ येत नाही शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने रक्षण करणारी कासंडी हे महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. सोबतच प्रा. तुकाराम भाऊ बिडकर यांच्यामुळेच मला सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचे मत सुद्धा आमदार अमोल दादा मिटकरी यांनी व्यक्त केले
सुरुवातीला माजी आमदार प्रा. स्वर्गीय तुकारामभाऊ बिडकर व नटराज च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी आमदार साजिद खान पठाण यांचे स्वागत सचिन गिरी तर आमदार अमोल दादा मिटकरी यांचे स्वागत यश ओमप्रकाश सावंल यांनी केले आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंचकावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रतिभाताई अवचार, निर्माता शत्रुघ्न बिडकर, प्रा. सदाशिव शेळके ,ज्येष्ठ हास्य सम्राट कवी किशोर बळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष यश सावंल, माजी नगरसेवक पराग कांबळे,आर डी जी महाविद्यालयाच्या प्राचार्य चारुशीला रुमाले,
आधी मान्यवर मंचकावर उपस्थित होते यावेळी आमदार साजिद खान पठाण यांचे स्वागत चित्रपट निर्माता प्रकाश तायडे यांनी केले तर आमदार अमोल दादा मिटकरी यांचे स्वागत यश सावंल यांनी केले त्यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या सिनेमाचे निर्माते म्हणून अनिल मालगे यांच्या शब्दावर होकार देणारे प्रकाश झिंगाची तायडे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांचा सत्कार आमदार साजिद खान पठाण व आमदार अमोल मिटकरी यांनी केला सोबतच चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे सचिन गिरी व सिनेमासाठी सहकार्य करनारे किशोर बळी यांचा सुद्धा सत्कार आमदार साजीद खान पठाण व अमोल दादा मिटकरी यांनी केला
तसेच आमदार साजिद खान पठाण व आमदार अमोल दादा मिटकरी यांनी शेतकऱ्यांचा विषय घेऊन सिनेमा तयार करत असल्याबद्दल अनिल मालगे यांचे कौतुक करून प्रा. स्वर्गीय तुकाराम भाऊ बिडकर यांच्या विचाराला घेऊन कार्य करीत असल्याबद्दल त्यांचा सत्कार केला
या कार्यक्रमाला दीपक पराते, राजेश पेंढारी, प्रभाकर आवचार,अडगावकर, स्वराज पडोळे,आर्यन सदांशिव,नचिकेत वजिरे,आश्लेषा बोळे,अभय प्रांजळे,जयेश वाघमारे,अश्विनी ठाकरे,प्रमोद वानखडे, आदित्य मालगे उपस्थित होते.
या शॉर्ट फिल्मच्या निर्मितीसाठी आरडीजी इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म टेलिव्हिजन अँड ड्रामॅटिक चे पवन महाजन, अमर अग्रवाल आणि राणी पाली यांचे सहकार्य लाभत आहे.यांच्यासह आर डी जी महाविद्यालयाचे कर्मचारी व प्राध्यापक उपस्थित होते अशी माहिती कार्यक्रमाची निर्माते अनिल मालगे यांनी कळवले
आपल्या प्रतिक्रिया द्या....