राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी
डी.एल.एड प्रथमवर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १८ जून रोजीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु ब-याच संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे अर्ज भरण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इ. बाबी राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. यासाठी उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहावे. असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.