कैवल्य एडुकेशन फॉउंडेशन व पिऱ्यामील फॉउंडेशनच्या वतीने किशोरवयीन वय 14 ते 18 वयोगटातील मुलींसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उदघाट्न हितकारिणी उच्च माध्य विद्यालय आरमोरी येथे झाले.
या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश मुलींमध्ये तांत्रिक ज्ञान वाढविणे, व्यावसायिक कौशल्य वाढविने,सोलर उद्योगात उद्योजगता व स्वयंरोजगारासाठी सज्ज करणे असे पिऱ्यामल फॉउंडेशनचे व्यवस्थापक भूपेंद्र सोनकुवर यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हितकारिणी उच्च माध्य विद्यालयाचे प्राचार्य यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि आज आधुनिक काळात मुलींनी स्वतःच्या पायावर उभे होण्यासाठी नवनवीन व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे व प्रगती करावी असे प्रतिपादन केले.
आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. प्रवीण राहाटे, मा. महेश धंडोले, प्रा. कु. शेंडे, प्रा. संदीप प्रधान प्रा. रूमदेव सहारे, प्रा.कु.घोनमोडे, उपस्थित होते. या कार्यक्रमाला आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी व हितकारिणी उच्च माध्य विद्यालय आरमोरी येथील विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कु. दिक्षा शेंडे, आभार गायत्री गोतमारे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. मोनिका कानतोडे यांनी सहकार्य केले.