चंद्रपूर:- गणेश नगर तुकूम चंद्रपूर येथे नरोटे सर सैनिक अकादमी व नरोटे सर कोचिंग क्लासेस मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. भारतातील नामांकित सैनिक शाळांत वर्ग सहावीत व नववीत प्रवेश मिळावा म्हणून अनेक विद्यार्थी सैनिक शाळा प्रवेश स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नरोटे सर सैनिक अकादमी मध्ये दरवर्षी शिकवणी करीता प्रवेश घेतात.
नरोटे सर अकादमीने दरवर्षी प्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षी सुध्दा सैनिक शाळा प्रवेश स्पर्धा परीक्षा -२०२५ चा निकाल शंभर टक्के दिला आहे. एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सैनिक शाळा स्पर्धा परीक्षा दिली होती. २३ मे रोजी निकाल जाहीर झाला असून सहाव्या वर्गात प्रवेशाकरीता २४ विद्यार्थी तर नवव्या वर्गाच्या प्रवेशासाठी १२ विद्यार्थी असे एकूण ३६ विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे. यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांपैकी आरोही जरीले, ईशानराजे थेरे,नमन ठमके,आरोही कावडे,श्रेयस पानघाटे,रीदीमा शेरकी,पुर्वा शिरोया,श्रेयस धाइत,प्रचित सावंत,साई दंडावार,प्राजंल बुरान,प्रवज्जा चहांदे, अर्चित वाटेकर,अनया ठाकरे,सानिध्या खनके , अवनी बिरमवार, समर्थ पाटील,अक्षर शेलेडिया, स्मित तोडासे,अधिराज कोरवार,निषित इंगोले,सानवी वराडे, कस्तुरी कटकमवार,अभिनव बावने हे २४ विद्यार्थी सहाव्या वर्गात प्रवेशासाठी पात्र झाले आहे.तर नाविन्या तेलेकर,पुष्कर चुरे, अवनी राठोड, बालाजी नरोटे,श्रीलेख भोंबे,सरोष डवरे,दिता शनैषचंद्रा,आरुष शेलवाडे, गौरी खंडलवार, सुशांत नागुलवार, गार्गी मंडपे,हरर्पित सिंग हे १२ विद्यार्थी नवव्या वर्गाच्या प्रवेशासाठी पात्र झाले आहे. मागच्या वर्षी याच अकादमीतुन RMS या राष्ट्रीय परीक्षेत सुनिधी निर्वाण ही महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थीनी पात्र झाली होती तर RIMC साठी तृष्टी मुरकुटे पात्र ठरली होती. या उत्कृष्ट निकालाची दखल घेऊन चंद्रपूरचे आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार व राजुरा चे आमदार मा देवरावदादा भोंगळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा व नरोटे सरांचा सपत्नीक सत्कार केला होता. ही घटना विद्यार्थी,पालक व चंद्रपूरकरांसाठी अभिमानाची आहे.
यावर्षी एकूण ३६ विद्यार्थी नरोटे सर सैनिक अकादमीचे यशस्वी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. नरोटे सर यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे शंभर टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले असून विद्यार्थ्यांच्या यशात नरोटे सरांचा मोठा वाटा आहे अशी प्रतिक्रिया विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....