कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)-- तहसील कार्यालयावर सुरू असलेल्या शेतकरी सत्याग्रहाला काँग्रेस कमिटीने आपला पाठिंबा जाहीर केला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना हेक्टरी मदत जाहीर कारावी,अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य ती दखल घेऊन मदत जाहीर करावी या सह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भोजराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शेतकरी सत्याग्रहाला पाठिंबा घोषित केला यावेळी वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अँड संदेश जैन जिंतुरकर, कारंजा लाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश पाटील लांडकर, कारंजा लाड शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष अमीर खान पठाण, वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी पंचायत राज समितीचे अध्यक्ष अँड वैभव ढगे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ सावध, कारंजा लाड भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष प्रदिप भाऊ राऊत, कारंजा लाड शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याकचे अध्यक्ष युसुफ जट्टावाले, अक्षय बनसोड, हंसराज इंगोले यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.असे वृत्त कॉंग्रेसचे धडाडीचे जिल्हा सेवादल समन्वयक अँड संदेश जिंतुरकर यांनी कळवीले.