कारंजा : सणांचा राजा दिवाळी आली म्हणजे १००% नागरिकांच्या घरोघरी नविन कपडे, घराचे परदे, बेडशिट, भांडीकुंडी खरेदी केली जात असतात . अशावेळी जुनी भांडी, कपडे, पडदे, बेडाशिट , चादरी, ब्लँकेट एकतर अडगळीत टाकली जातात किंवा भंगार मध्ये बेभाव विकली जातात . काही धनदांडगे तर अक्षरशः टाकाऊ म्हणून कचरा कुंडीत देखील फेकून देतात .परंतु लक्षात घ्या रस्त्यावर किंवा पालांवर निवासाला असलेल्या बेघर, गोरगरीब, दिव्यांग किंवा लाचारीने भिक्षुकी करणाऱ्यांना जर तुम्ही नेऊन दिले तर येणाऱ्या थंडीच्या दिवसात किंवा परिस्थितीने अडचणीत असलेल्या त्यांना त्याचा चांगला उपयोग होईल . तसेच दिवाळी निमित्त अनेकाच्या घरी स्वयंपाक, गोडाधोडाचे मिस्टान्न पदार्थ, दिपावली फराळ केला जातो . अनेकदा त्या फराळा मधील पदार्थ शिल्लक होतात . व गरजे पेक्षा जास्त पदार्थ झाली तर आम्ही बघतो की नागरिक रस्त्याच्या कडेला फेकतात . तेव्हा अन्न हे परब्रम्ह समजून नाश होण्या ऐवजी आपण जर गोरगरीबांच्या मुलांना किंवा दिव्यांग अथवा भिक्षुकांना दिले तर त्यांना सुद्धा खायला मिळून तुम्हाला त्यांच्या तृप्तीमुळे त्यांचे आशिर्वाद मिळून पुण्य लाभेल. आणि संत गाडगे बाबाच्या रंजल्या गांजल्याच्या दशसुत्री संदेशाचे पालन होईल तरी सर्वांनी माझ्या विनंतीचे पालन करावे असे कळकळीचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी केले आहे .