अमरावती येथील विद्यार्थ्यांची ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र (Regional (Regional Research Centre - RRC), अमरावती येथे शैक्षणिक भेट दिली. या भेटीचे आयोजन माननिय प्राचार्य डॉ. अनिल ठाकरे व उपप्राचार्य श्री. नितेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, हे यावेळी RAWE कार्यक्रम समन्वयक प्रा. श्वेता देशमुख मॅडम विद्यार्थ्यांना घेऊन उपस्थित होत्या. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाची माहिती देणे हा होता.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी RRC येथील वैज्ञानिकांसोबत संवाद साधून केंद्रातिल विविध संशोधन प्रकल्पांची माहिती घेतली. विशेषतः सोयाबीन वाणांवरील महत्त्वपूर्ण संशोधन ॲग्रोनॉमी विभागांतर्गत विकसित विविध वाण , किटकशास्त्र विभागातील संशोधन तसेच पिक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेती आणि संशोधन यांच्यातील संबंध समजून घेता आला. तसेच या भेटीमुळे विद्यार्थ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान संशोधनाची दिशा व त्याचे शेतकरी हितासाठी होणारे योगदान यांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून तज्ञांकडून मौल्यवान मार्गदर्शन आत्मसात केले.
या शैक्षणिक भेटीमुळे कृषी विद्यार्थ्यांचे ज्ञानक्षेत्र अधिक विस्तारले असून,भविष्यातील शेतकरी समस्यांचे समाधान शोधण्यासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक अनुभव व दृष्टिकोण त्यांना प्राप्त झाल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. पि. आर. पोटे पाटिल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि RAWE कार्यक्रमाच्या समन्वयक यांनी सांगितले की अशा प्रकारच्या भेटी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.यातून त्यांना कृषी संशोधन आणि विस्तार कार्याची माहिती मिळते.ज्यामुळे ते भविष्यात एक चांगला कृषी संशोधक म्हणून देशाच्या कृषी विकासाला हातभार लावू शकतील.