बल्लारपूर शहरातील टिळक वॉर्डातील नवीद सिद्दीकी (19) यांचा चंद्रपूर रेल्वे स्थानकावर 12285 क्रमांकाच्या सिकंदराबाद-निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेसने दिलेल्या धडकेत काल सायंकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नावेद सिद्दीकी हा बल्लापूर विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुनैद उर्फ छोटू सिद्दीकी यांचा हा भाऊ होता. तो सिकंदराबाद निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेस क्रमांक 12285 या गाडीने चंद्रपूरला जाण्यासाठी १४/०७/२०२३ ला सायंकाळी 6 च्या सुमारास बल्हारशाह रेल्वे स्थानकावरून चढला. मात्र चंद्रपूर रेल्वे स्थानकावर ट्रेन चा थांबा न मिळाल्याने नावेदने चालत्या ट्रेनमधून प्लेटफॉर्मवर उडी मारली, त्यामुळे नावेद गंभीर जखमी झाला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, उपचारादरम्यान नावेदचा मृत्यू झाला.