महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६२ वा वाढदिवस शिवसेना चिमूर विधानसभा क्षेत्र अंतर्गत ब्रम्हपुरी तालुक्यातील सोंदरी येथील ग्रामपंचायत पटांगणावर आयोजित करण्यात आला. उद्धवजी ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस विशेष कार्यक्रम राबवून शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण, ७५ टक्के अनुदानावर आधारीत कृषी विभागाच्या योजनाच्या अर्जाचे वितरण व गावकऱ्यांना मिठाई वाटप करून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा ६२ वा वाढदिवस शिवसेना चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हा प्रमुख प्रा.अमृत नखाते यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत सोंदरी येथील पटांगणावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबा, बेल, करंजी, बदाम, कडुलिंब व जांभूळ अशा अनेक विविध प्रजातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. प्रसंगी ग्रामपंचायत परिसरात कृषी विभागातर्फे अनुदानावर उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या योजनांच्या अर्जाचे वितरण गावकऱ्यांना करण्यात आले. सोबतच ग्रामपंचायत सदस्य, गावकरी व शिवसैनिकांना मिठाईची वाटप करून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविधांगी कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना ब्रह्मपुरीचे उपतालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सोंदरीचे सरपंच केवळराम पारधी, उपतालुकाप्रमुख डॉक्टर रामेश्वर राखडे, विभाग प्रमुख गुलाब बागडे, मोरेश्वर अलोने, रामचंद्र मैद, ग्रामपंचायत सदस्य गजानन दोनाडकर, गजानन भाजीपाले, श्रीकृष्ण तूपट, शिवकुमार आंबोने, बंडू बन्सोड, गोपी दाणी, दिवाकर देशमुख, मनोज घुटके, जनार्दन पारधी, बाबुराव ढोरे, व्यंकट देशमुख, विजयजी देशमुख आदी गावकरी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.