कारंजा (लाड) : कारंजा तालुक्याच्या बँकीग क्षेत्रातील, शेतकरी व अन्य ग्राहकांच्या विकासासाठी अग्रगण्य असलेल्या नावलौकीक प्राप्त "प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्था" कारंजाच्या अध्यक्षपदी आकाश कऱ्हे यांची तर उपाध्यक्षपदासाठी पांडूरंग भगत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या बाबत सविस्तर वृत्त असे की,संचालक मंडळासाठी नुकतीच दि.०७ सप्टेंबर २०२५ रोजी,लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पडलेली असून सदर निवडणूकीत "विकास पॅनल"चा दणदणीत विजय झाला आहे.त्यानंतर दि २३ सप्टेंबर २०२५ रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात नवनिर्वाचित संचालकांची पहिली अधिसूचीत सभा आयोजीत करण्यात आली होती. त्यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होऊन त्यामध्ये आकाश कऱ्हे यांची अध्यक्ष म्हणून तर पांडूरंग भगत यांची उपाध्यक्ष म्हणून अविरोध निवड करण्यात आली. सदर सभेला सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी पि.टी. सरकटे साहेब उपस्थित होते.यावेळी झालेल्या बैठकीत संचालक आशिष बंड यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची घोषणा केली.निवडीनंतर पतसंस्थेच्या कार्यालयात नवनिर्वाचित अध्यक्ष आकाश कऱ्हे आणि उपाध्यक्ष पांडूरंग भगत यांनी महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले.त्यानंतर सर्व संचालक,कर्मचारी वृंद आणि अल्पबचत प्रतिनिधी यांनी पुष्पगुच्छ देवून अध्यक्ष आकाश कऱ्हे आणि उपाध्यक्ष पांडूरंग भगत यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.यावेळी मनोगत व्यक्त करतांना अध्यक्ष आकाश कऱ्हे यांनी, "प्रशिक पतसंस्था ग्राहकांच्या हितासाठी अविरत कार्यरत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला." या संपूर्ण निवड कार्यक्रमाला ॲड.रविभाऊ रामटेके,सुनिताताई, उके,प्रशांत पाटील काळे,ओंकार पाढेण, मेघन जुमळे,गुलाबराव साटोटे, सर्व संचालक आणि कर्मचारी वर्गाची उल्लेखनिय उपस्थिती होती.