भर उन्हात विविध वस्तुंची रस्त्यावर विक्री करणाऱ्या फुटपाथ विक्रेत्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे, या हेतुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
ब्रम्हपुरी शहरातील विविध चौकातील, रस्त्यांवरील फूटपाथ विक्रेत्यांना या छत्र्या वाटप करण्यात आलेल्या आहे.
आपल्या कुटुंबाची जिविका चालवण्यासाठी अनेक गरीब व्यक्ती, निराधार महिला भगिनी, दिव्यांग व्यक्ती हे फूटपाथ वर आपला लहान व्यवसाय चालवतात.
ऊन असो की पाऊस रोज व्यवसाय करून कष्टाने दोन पैसे कमवून कुटुंबाची जबाबदारी सन्मानाने यशस्वीपने पूर्ण करतात. अश्या फूटपाथ विक्रेत्यांच्या समस्यांची जाणीव ठेवून अशा अनेक व्यावसायिकांना छत्री उपलब्ध करून देऊन उन्हात सावली देण्याचा प्रयत्न पालकमंत्री नाम विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केला आहे.
सदरच्या छत्र्यांचे वितरण करतांना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक हितेंद्र राऊत, ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे गटनेता तथा बांधकाम सभापती विलास विखार, पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार व काॅंग्रेस पक्षाचे विविध कार्यकर्ते यांची यावेळी उपस्थिती होती.