आरमोरी :- देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली क्रांतिवीर शहीद भगतसिंग ,सुखदेव व राजगुरू यांनी इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले क्रांतिवीरांच्या उठावाने युवकांमध्ये इंग्रज सरकारच्या विरोधात बंड करण्याचे बळ निर्माण झाले या बंडाने संपूर्ण इंग्रज सरकार हादरले होते क्रांतिवीर शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना इंग्रजी न्यायव्यवस्थेने २४ मार्च १९३१ ला फाशीची शिक्षा सुनावली होती मात्र या दिवसाच्या आदल्या दिवशीच क्रांतिवीरांना दिनांक २३ मार्च १९३१ ला फाशीची शिक्षा देण्यात आली तेव्हा देशाच्या या क्रांतिवीरांनी हसत हसत आपल्या प्राणाची आहुती देत देशासाठी बलिदान दिले देशाच्या महान क्रांतिवीरांच्या आठवणीत व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहीद दिवस पाळला जातो आरमोरी येथील लोकहित संघर्ष समितीतर्फे आज दिनांक ला क्रांतिवीरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून शहीद दिन बनविण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष,मा. रंजीतजी बनकर , युवारंग चे कोषाध्यक्ष मा.प्रफुलजी खापरे, प्रहार जनशक्ती पक्ष गडचिरोली चे मा.निखिलजी धार्मिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी गडचिरोली चे जिल्हा सचिव मा.अमोलजी मारकवार , प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख मा. विनोदजी निमजे,प्रहार चे शहर प्रमुख मा. रिंकूजी झरकर, युवारंग चे संघटक मा.सुरजजी पडोळे ,मा.नेपचंद्रजी पेलणे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष मा. दिवाकरजी गराडे , प्रहार जनशक्ती पक्षाचे महिला आघाडी सदस्य मा. शुभांगीताई गराडे युवारंग चे सदस्य रोहितजी नैताम, महेशजी पेलणे उपस्थित होते