कारंजा :- शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून त्यानिमित्ताने व विकासमहर्षी स्व.प्रकाशदादा डहाके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, सरकार आणि राजे शिवछत्रपती परिवाराचे शिवप्रेमी यांच्या अथक प्रयत्नातून कारंजा शहरात, शुक्रवार दि. ०६ जून रोजी,भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या विशेष उपस्थितांमध्ये श्री गुरु मंदिर संस्थानचे विश्वस्त निलेशजी घुडे, युवा नेते देवव्रत डहाके व सौ तेजस्वीनीताई देवव्रत डहाके, माजी नगरसेवक प्रसन्ना पळसकर ,अमोल अघम, अजय श्रीवास, सुधीर लुंगे, समीर देशपांडे होते. सदर रक्तदान शिबीर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरकार गृप आणि अखंड राजा शिवछत्रपती परीवारातील मावळे - विभागप्रमुख मयुर लळे, कार्याध्यक्ष निलेश पारे, चलचित्र प्रमुख किशोर तावरे, मुख्यसंपर्कप्रमुख विशाल लाडोणे, सहमुख्यसंपर्कप्रमुख शिवा कापसे, सरकार ग्रुप अध्यक्ष विक्की पाटील चौधरी व सदस्य विकास काजे,प्रणय करडे,संदेश राऊत,आदेश राऊत,आदित्य बलखंडे,अनुराग बालबोरे,हर्षद पाठे,प्रथमेश खांजोडे,संकेत चौधरी,अजिंक्य तीलगाम,चित्रांश गिरमकार, समर्थ शिशेकर,राज डहाके, सत्यजित डहाके,आकाश ढाकुलकार,सिद्धेश डहाके, सविज जगताप,श्रेयस कदम, भारत तोडकर,ओम गिरमकार, यश पल्लेवार,सुमीत बंग,अंकीत जवळेकर ई सदस्यांनी अथक प्रयत्न केले. या प्रसंगी गरजू रुग्नांना वेळेवर रक्त मिळावे या उदात्त मानवसेवेकरीता एकूण रक्तदात्यांनी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी केल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषद मुंबईचे विदर्भ उपाध्यक्ष आणि करंजमहात्म्य न्युज नेटवर्क्सचे संचालक संजय कडोळे यांचेकडे,विजय खंडार यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....