आरमोरी :-
येणारा खरीप हंगाम यशस्वी करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याकरिता उपलब्ध सर्व तंत्रज्ञान सहजरीत्या शेतकरी बांधवापर्यत पोहचविण्यासाठी तालुका कृषि अधिकारी, आरमोरीच्या वतीने खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन दि. ०६/०५/२०२५ रोजी तहसील कार्यालय, आरमोरीच्या सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेचे अध्यक्ष स्थानी श्री महेश परांजपे, उपविभागीय कृषि अधिकारी, वडसा हे हजर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्री विक्रम कदम, विषय विशेतज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर, श्री निलेश गेडाम, तालुका कृषि अधिकारी, आरमोरी, श्रीमती मेश्राम मॅडम माहीम आरमोरी, श्रीमती पल्लवी कुंभरे, उमेद आरमोरी, कु. जोत्सना घरत, मंडळ कृषि अधिकारी, आरमोरी, श्री युगेश रणदिवे, कृषि अधिकारी, आरमोरी, श्री वसंत शेंडे कृषि पर्यवेक्षक, आरमोरी, श्री महेंद्र दोनाडकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आरमोरी हे हजर होते.
सदर कार्यशाळेच्या प्रास्ताविकात श्री निलेश गेडाम, तालुका कृषि अधिकारी, आरमोरी यांनी आरमोरी तालुक्याचे खरीप हंगाम २०२५ चे केलेले नियोजन उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगीतले.
डॉ. श्री विक्रम कदम, विषय विशेतज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर संकरीत गाईचे संगोपन व घ्यावयाची काळजी, शेळीपालन, कुक्कुटपालन इ. बाबत उपस्थीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून, पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहीती दिली व प्रत्येक शेतकऱ्याने शेतीस पुरक व्यवसाय म्हणून पशुपालन करावे असे आवाहन केले.
श्री. युगेश रणदिवे, कृषि अधिकारी, आरमोरी यांनी भात पिक लागवड या विषयावर बियाण्याची निवड, नर्सरी तयार करणे, रोवणी करतांना घ्यावयाची काळजी, खत व्यवस्थापण, किड-रोग इ. विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कु. जोत्सना घरत, मंडळ कृषि अधिकारी, आरमोरी यांनी शेतकऱ्यांना कृषि विभागामार्फत राबविण्या येणाऱ्या विविध योजनांची माहीती देवून सदर योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
श्री महेंद्र दोनाडकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आरमोरी यांनी सेंद्रीय शेती या विषयावर मार्गदर्शन करून जीवामृत, घण जीवामृत, दशपर्णी अर्क, एस-९ कल्चर इ. बाबीवर मार्गदर्शन करून कमी खर्चाची व विषमुक्त सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
श्री वसंत शेंडे कृषि पर्यवेक्षक, आरमोरी यांनी तुर पिक लागवड व व्यवस्थापण याबाबत मार्गदर्शन केले.
उपस्थित शेतकऱ्यांना धान बियाण्याची उगवनक्षमता तपासणी व बिजप्रक्रिया याबाबत कृषि सहायक श्री प्रमोद धोंडणे, श्री नागसेन सरकटे, कु. स्मिता शंभरकर, कु. रक्षा कुळमेथे यांनी प्रात्याक्षिक करून दाखविले.
सदर कार्यक्रमाचे संचालन श्री वसंत शेंडे, कृषि पर्यवेक्षक यांनी तर आभार प्रदर्शन कु. प्रिया आखाडे, कृषि पर्यवेक्षक यांनी मानले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता कृषि सहायक श्री नितीन कुंभारे, श्री प्रेमराज मेश्राम, श्री पराग सहारे, श्री भारत आळे, कु. लिना करंगामी व कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मदत केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....