ब्रम्हपुरी:-
तालुक्यातील सुरबोडी गाव येथे सेवा पंधरवाडा कार्यक्रम राणी मंडळ नवरगाव च्या वतीने नागरिकांच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हावे त्यांना तात्काळ दाखले मिळावे त्यांचे रखडलेले काम या शिबिरामधून व्हावे या उद्देशाने सुरबोडी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी अनेक ठिकाणचे लाभधारक आले होते. पिंपळगाव, सोंद्री, चिखलगाव, लाडज, हरदोली ,सोनेगाव, सावलगाव,चिंचोली, व अन्य बरेच शेतकरी बांधव महिला व पुरुष या ठिकाणी कोणाचे सातबारा, आठ, उत्पन्नाचे दाखले अल्पभूधारकाचे दाखले त्याचप्रमाणे अन्न व पुरवठा विभागाद्वारे नवीन राशन कार्ड काढणे, फाटलेल्या राशन कार्ड ऐवजी नवीन राशन कार्ड बनवणे,नवीन नावाची नोंद करणे इत्यादी कामे करण्यात आले, त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी योजना कौटुंबिक अर्थसाह्य योजना, विधवा,अपंग निराश्रीत, लोकांसाठी योजना याकरिता मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.
या कार्यक्रमासाठी माननीय तहसीलदार उषा चौधरी मॅडम यांनी नागरिकांना विविध विषयाचे विषय योजना समजावून सांगितले तसेच शिबिरात लोकांना तात्काळ दाखल्याचे वाटप केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. पी.जी.एरमे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता तलाठी भावना निमजे मॅडम तलाठी पिंपळगाव ,अर्चना सेलोकर मॅडम, तलाठी अमित मूल चिखलगाव राजेश अकोजवार ,तलाठी नान्होरी,श्री, हिमांशू पाजनकर तलाठी तोरगाव (बु),महसूल सहाय्यक श्री, ताराचंद राऊत अन्न पुरवठा शाखा, श्री. दिलीप मेश्राम तसेच कोतवाल अमित मेश्राम, राजेंद्र गजभिये, शरद ढोक सरपंच सुरबडी,श्री.राधिका बावनकुळे सरपंच सावलगाव, पौर्णिमा पचारे तसेच सभोवतालचे शेतकरी व महिला वृद्ध मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी आले होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....