अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी तालुक्याची मासिक सभा मा.डाॕ. नारायण मेहरे अध्यक्ष विदर्भ प्रांत यांच्या अध्यक्षतेखाली व मा. नितिनजी काकडे सचिव विदर्भ प्रांत हे प्रमुख पाहुणे तसेच मा. प्रकाशजी भुजाडे जिल्हा सचिव नागपूर , मा.विलासजी ठोसर सचिव नागपूर महानगर यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेचे प्रास्ताविक श्री. ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले.
शोषणमुक्त, भ्रष्टाचारविरहीत, नैतिक मूल्याधिष्ठित समाजरचना निर्माण करणे ही अ.भा.ग्राहक पंचायतीची संकल्पना हाच ग्राहकांना पर्याय आहे. आज प्रत्येक ग्राहक नाडला जात आहे याला कारण म्हणजे त्याला अधिकाराची जाणीव नाही व ग्राहक हा संघटित नाही. वैयक्तिक स्तरावर त्याची पिळवणूक व शोषण थांबविणे हे ग्राहक चळवळीचे उद्दिष्ट आहे. असे विचार सभेत विदर्भ प्रांत अध्यक्ष डाॕ. नारायण मेहरे यांनी मांडले. तर प्रमुख पाहुणे विदर्भ प्रांत सचिव श्री. नितीनजी काकडे यांनी ग्रामीण भागातील गावागावात जाऊन ग्राहक संघ स्थापन करून ग्राहक पंचायतचे विचार सर्वदूर पोहचवावे असे प्रतिपादन केले. श्री. प्रकाशजी भुजाडे यांनी सदस्यांनी सचोटीने ग्राहक चळवळीचे कार्य पुढे न्यावे सांगितले. सभेत बोलतांना विलासजी ठोसर यांनी सदस्यसंख्या वाढवून ग्राहकांचे समुपदेशन करावे असे सांगितले.
यावेळी पारशिवनी तालुका अध्यक्ष नरेश उराडे, ज्ञानेश्वर चौधरी,रेखा दुनेदार, सिंधुताई चव्हाण,पुष्पा पालीवाल, रघुनाथ पुंडे, विठ्ठलराव गांजरे, विजय भरणे, भाऊराव कुरळकर, राजेश देशमुख, रोषण पिंपळामुळे,कपिल मोटघरे, राजेश आमदे, रामेश्वर दुनेदार, प्रल्हाद अलोणे, राधिका बांगडकर, शुभदा उराडे,वंदना खडसे, मनिषा गोळंगे, किरण आहाके, वनिता मलवे, शोभा शेलोकर, संतोषी पुंडे, श्री.गोरडे हजार होते.
सभेचे संचालन श्री. नरेश उराडे यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती सिंधुताई चव्हाण यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....