आज कोजागीरी पोर्णिमा आणि ईद मिलानदुन्नबी असे हिंदु-मुस्लिमांचे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे सकाळपासूनच सर्वधर्मियांमध्ये शांती, सलोखा व एकात्मतेचा आनंदोत्सव सुरु होता. शिवाय आज श्री आसरा मातेच्या घटविसर्जनाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक नवदुर्गोत्सव मंडळ आणि विविध आसरा माता मंदिरांवर महाप्रसाद (अन्नदानाचे ) कार्यक्रम सुद्धा सुरु होते. शिवाय आज रविवार आठवडी बाजार असल्यामुळे बाजार पेठेत अनेक ग्रामिण शेतमजूर, कामगार, चाकरमाने आठवड्याच्या किराणा, भाजीपाला, जिवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत होते . असे असतांना अचानक आकाशात ढग टाटून आले व क्षणार्धात दुपारी पाच ते सव्वा सहा वाजेपर्यंत ढग फुटी सदृश्य पाऊस कोसळला त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे, ग्रामिण चाकार मान्यांचे आणि शेकडो गोरगरीबांचे नुकसान झाले असून ह्या पावसाने अनेक शेतकऱ्याच्याच सोयाबिन पिकाचे सुद्धा भयंकर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याचे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे .